2
आगरी समाजाची संस्कृतीआगरी समाजाचे मूळ हे शेती आहे. शेतकरी आणि कष्टाळू लोक जे निसर्गावर खूप प्रेम करतात अशा लोकांची हि संस्कृती आहे. ह्या समाजातील सर्व पुरुष आणि स्त्रिया त्यांच्या घरासाठी, तसेच शेतात आणि मीठ उत्पादनासाठी एकत्रितपणे काम करतात. ह्या समाजात एकता आणि त्याच प्रमाणे स्त्री-पुरुष समानता अशा दोन्ही गोष्टी तुम्ही पाहू शकता.आगरी समाजाचे लोक महाराष्ट्रात, रायगड, ठाणे आणि मुंबई ह्या तीन जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आहेत. मासेमारी, मीठ उत्पादन आणि भाताची शेती हे आगरी लोकांचे प्रत्यक्ष व्यवसाय आहेत. भात, मासे आणि भाकरी हा त्यांचा मुख्य आहार आहे. गणेशोत्सव, रामनवमी, हनुमान जयंती तसेच नारळी पौर्णिमा हे त्यांचे प्रमुख उत्सव आहेत.

Comments

Who Upvoted this Story